लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गुरुवारी २०१८-१९ चा शेष फंडासह २०१९-२० चा मुळ अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडण्यात आला. त्याला सवार्नुमते अंतिम मान्यता देण्यात आली.सेनगाव येथील पंचायत समितीची बैठक गुरुवारी सभापती स्वाती पोहकर, उपसभापती ममता वडकुते, गटविकास अधिकारी के.व्ही.काळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सदर बैठकीला पंधरा पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीत मुख्य लेखा वित्त अधिकारी डॉ. डी.के.हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक लेखा अधिकारी नितीन बंडाळे यांनी २०१८-१९ चे १६ लाख ५० हजार शेष नियोजन अंतिम मान्यतेसाठी तर पुढील आर्थिक वर्षातील ५ लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक मान्यतेसाठी सभागृहात मांडले. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. या मासिक बैठकीला सहायक गटविकास अधिकारी बी.जी.पंडित सह लेखा विभागाचे सुधीर राखोंडे, अनिल गव्हाणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.
मासिक बैठकीत शेष फंडाला अंतिम मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:09 AM