अखेर ओमसाई मंगल कार्यालयास ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:40 AM2021-02-27T04:40:48+5:302021-02-27T04:40:48+5:30
हिंगोली : मागील दोन-तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये न. प. ने पोलिसांच्या ...
हिंगोली : मागील दोन-तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये न. प. ने पोलिसांच्या मदतीने विनामास्क फिरणाऱ्यांना दंड लावण्याची मोहीम २० फेब्रुवारीपासून सुरू केली आहे.
२५ फेब्रुवारीला शहरात विनामास्क फिरणाऱ्या १४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापोटी २२०० रुपये वसूल करण्यात आले. २६ फेब्रुवारील शहरातील इंदिरा चौक येथे मोहीम राबविण्यात आली. यावेळी १३ नागरिकांकडून २६०० रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले.
शहरानजीक खटकाळी भागातील ओमसाई मंगल कार्यालयात कोरोनाचे नियम न पाळल्याप्रकरणी नगरपरिषदेेने कार्यवाही करत मंगल कार्यालयास ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ फेब्रुवारील ओमसाई मंगल कार्यालयाला लग्नसमारंभ आयोजित करून ५० पेक्षा जास्त नागरिकांची गर्दी केली. विशेष म्हणजे हा समारंभ विनामास्क केला गेला. त्यामुळे नगरपरिषदेच्यावतीने मंगल कार्यालयला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. या पथकात बी. के. राठोड, डी. पी. शिंदे, पंडित मस्के, नागेश नरवाडे यांचा समावेश होता.