वंजारवाडा भागातील पाच रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:41+5:302021-07-04T04:20:41+5:30
हिंगोली शहरातील जुना भाग असल्याने या भागात दाटीवाटीची वस्ती आहे. शिवाय अनेकांचे अतिक्रमणही होते, तर काहींचे पक्के बांधकाम न.प.च्या ...
हिंगोली शहरातील जुना भाग असल्याने या भागात दाटीवाटीची वस्ती आहे. शिवाय अनेकांचे अतिक्रमणही होते, तर काहींचे पक्के बांधकाम न.प.च्या डी.पी. प्लॅननुसार पाडण्याची गरज होती. यामध्ये अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले तर काहींनी न.प.च्या पथकाला सहकार्य करून अतिक्रमण काढून घेतले. या भागातील नागरिकांना अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. शिवाय या परिसराच्या विकासातील गतिरोधकच हे रस्ते बनले होते. मात्र, रस्ते विकास प्रकल्पात या रस्त्यांची कामे मंजूर झाल्याने अतिक्रमण हटेल काय? हा प्रमुख प्रश्न होता. मात्र, त्यावर या भागातील नागरिकांनीच उत्तर शोधल्याने न.प.च्या पथकांचे काम सोपे झाले. नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनीच आपल्या घराच्या परिसरातील रस्ता मोकळा करून दिल्याने इतरांनीही पालिकेला साथ दिली. इतर भागातही आपसांतील स्पर्धेतून सर्वांनीच रस्ते मोकळे करून दिले. त्यामुळे या भागातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.