जिल्ह्यात हिंगोली परिसरात ६, सेनगाव ७२, औंढा नागनाथ ३७, कळमनुरी १४ असे १२९ जणांची रॅपिड अँटिजन तपासणी करण्यात आली होती. यामध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नाही. आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात १८ जणांची तपासणी केली असता शिवाजीनगरात १ रुग्ण आढळला. तसेच औंढा परिसरात १३७ जणांची तपासणी केली असता जवळा बाजार येथे तीन रुग्ण आढळले. तर कळमनुरी परिसरात ३७ व वसमत परिसरात ३४ जणांची तपासणी केली असता एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात ३ रुग्ण बरे झाले असून यात हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डातील २ व लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील १ रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ९३४ रुग्ण आढळले असून त्यातील १५ हजार ५१४ जण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला ३९ रुग्णांवर उपचार सुरू असून यातील २७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचे नवे चार रुग्ण; ३ बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:21 AM