वीजपुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:40 AM2021-02-27T04:40:59+5:302021-02-27T04:40:59+5:30
वातावरणामध्ये बदल हिंगोली : शहरात दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असताना, शुक्रवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण ...
वातावरणामध्ये बदल
हिंगोली : शहरात दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असताना, शुक्रवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण पसरले. यामुळे पाउस पडतो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागल्यामुळे त्यांची मोठी धावपळ झाली. सध्या हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आल्याने वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली.
केंद्रा बु.-गोरेगाव रस्त्याची दुरवस्था
कहाकर बु.: सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु.-गोरेगाव रस्त्याची सहा महिन्यांपासून दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर मोठाले खड्डे व रस्त्यातील गिट्टीही उघडी पडली आहे. अनेक वाहनांची वर्दळ या मार्गावरून असून, या रस्त्यावर नेहमी धुळीचे वातावरण राहत असून, याचा मोठा त्रास ये-जा करणाऱ्यांना होत आहे.
गतिरोधक बसविण्याची मागणी
हिंगोली : शहरातील आदर्श कॉलेजजवळील पाण्याची टाकी परिसरात झालेल्या नवीन सिमेंट रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांतून होत आहे. हा रस्ता नवीन असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने धावत आहे. यामुळे या मार्गाच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणे फार कठीण झाले आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा घालण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी वाढली आहे.