शहरातील नगरपालिकेमार्फत मागील काही दिवसांपासून अतिक्रमण मोहीम सुरू होती. ८ ऑक्टोबर रोजी नगरपालिकेच्या पथकातील अधिकारी, कर्मचारी शहरातील भाजीमंडईतील अतिक्रमण काढून घेत होते. यावेळी ३० ते ३५ लोकांनी गोंधळ घातला. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करीत कामात अडथळा निर्माण केला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
१० ऑक्टोबर
पोकळ आश्वासनांमुळे बैठकीत खडाजंगी
जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार मांडल्या जाणाऱ्या प्रकरणांमुळे चौकशी करून, अहवाल सादर करून पोकळ आश्वासने दिली जात असल्याने सदस्यांनी सभेत प्रशासनाला धारेवर धरले. मोघम नव्हे, तर ठोस आश्वासन दिल्याशिवाय बैठक पुढे सरकू न दिल्याने ही बैठक मॅरेथॉन ठरली.
२८ ऑक्टोबर
काँग्रेसचे पीककर्ज, दुष्काळी मदतीसाठी आंदोलन
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काँग्रेसच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी हिंगोली येथील जिल्हा कचेरीसमोर २७ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले.