जवळा बाजार येथे सव्वा लाखाचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:20 AM2021-06-27T04:20:15+5:302021-06-27T04:20:15+5:30
जवळा बाजार येथील एका गोदामात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार ...
जवळा बाजार येथील एका गोदामात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि.उदय खंडेराय, पोउपनी किशोर पोटे, सपोउपनि बालाजी बोके, पोह. संभाजी लकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, पोना शंकर ठोंबरे राजू ठाकूर, पोशि किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, चापोशि शेख जावेद, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने २६ जून रोजी दुपारी जवळा बाजार येथील एका गोदामावर छापा टाकला. यावेळी या बसथांबा परिसरातील एका गोदामात शासनाने प्रतिबंधित केलेला १ लाख ३९ हजार २५ रुपये किमतीचा माणिकचंद, गोवा, सुगंधी विमल केशर युक्त पान मसाला, सुगंधी राज निवास पान मसाला, सुगंदी पान पराग आदी नावाचा गुटखा आढळून आला. तपासात हा गुटखा सुभाष किसनराव लुटे (रा.माळेगल्ली शिरड शहापूर हा.मु. जवळा बाजार) याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
दोन दिवसांत दुसरी कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जून रोजी कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बु. येथे छापा टाकून ७१ हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी तब्बल १ लाख ३९ हजार २५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
फोटो : ३५