यात तालुकानिहाय हिंगोली ५९, कळमनुरी ४९, वसमत १४.८, औंढा २७.४, तर सेनगावात सरासरी १७.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील दहा ते बारा दिवांपासून ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही भागात या पावसाचा फटकाही बसला आहे. मंडळनिहाय हिंगोली ७५.५ मि.मी., नर्सी ७१.५, सिरसम ६९.५, बासंबा २५.८, डिग्रस ६७.३, माळहिवरा ७२.३, खांबाळा ३१, कळमनुरी ८६, वाकोडी ४८.८, नांदापूर ६५.३, आखाडा बाळापूर ४३.८, डोंगरकडा २८.३, वारंगा २२, वसमत १२.३, आंबा २२.५, हयातनगर १७, गिरगाव १६.८, हट्टा १५.५, टेंभुर्णी २.८, कुरुंदा १६.५, औंढा ९.८, येहळेगाव ५८.०, साळणा १९.५, जवळा २२.३, सेनगाव २०.३, गोरेगाव २५.८, आजेगाव ०, साखरा २४.३, पानकनेरगाव १७.५, हत्ता १८ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.
६५ मि.मी.पेक्षा जास्त पर्जन्य झाल्यास अतिवृष्टी झाल्याचे मानले जाते. सात मंडळांत यापेक्षा जास्त पाऊस झाला, तर काही ठिकाणी त्यापेक्षा थोडा कमी पाऊस झाला आहे. मात्र, या पावसाने नदी, नाले वाहते केले आहेत.