लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुका क्रीडा संकुलास ६ एकर जागा उपलब्ध करुण देत बांधकामासाठी २२ लाखांचा पहिला हप्ता उपलब्ध करुण दिल्याबद्दल क्रीडाप्रेमी व बॅडमिंटन क्लबच्च्या वतीने २३ मार्च रोजी दुपारी जिल्हाधिका-यांचा सत्कार केला.हिंगोलीत तालुका क्रीडा संकुलास जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने मंजुरी मिळाली असून ६ एकर जागा सुद्धा मंजूर झालेली आहे. तसेच पहिला टप्पा बावीस लक्ष रुपये निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. जिल्हाधिकाºयांच्या ऋण निर्देशासाठी क्रीडाप्रेमींतर्फे सत्कार केला.यावेळी उपजिल्हाधिकारी बोरगावकर, महिला बालविकास अधिकारी गणेश वाघ, नगर अभियंता अशोक अग्रवाल, अग्रवाल नवयुवक संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज अग्रवाल, बॅडमेंटन क्लबचे अध्यक्ष प्रदीप अग्रवाल, जेष्ठ खेळाडु गोविंद चौधरी, डॉ.सत्यनारायण तापडिया, डॉ.श्रीधर कंदी, डॉ.अजय शिराडकर, राजाराम बांगर, सूर्यकांत खाडे, पंकज राठोड, संतोष वेरूळकर, गजू पिल्ले, कृष्णा अग्रवाल, शशिकांत दोडल, शैलेश तापडिया, किशन सोमाणी आदी उपस्थित होते.
हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:40 PM