लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदर्श ऐज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्व.सेठ बलभद्र कयाल (स्मृती प्रित्यर्थ) आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन झाले.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कमलकिशोर काबरा तर उद्घाटक रामचंद्र कयाल होते. या प्रसंगी रमेशचंद्र बगडिया, मधुकर दोडल, ज्ञानेश्वर गोटरे, रमेश मुंदडा, मो.सलिम अब्दुल सत्तार, नारायण बांगर, विजय काबरा, सदाशिव सराफ, विजय काप्रतवार, मदनलाल अग्रवाल, चंद्रकांत निलावार, भगवान अग्रवाल, इंदरचंद सोनी, बद्रीनारायण बगडिया, माणिकचंद जैन, मुरलीधर मुंदडा, रमेशचंद्र चांडक, गणेश चौधरी, विद्यार्थी सांसद सचिव कांचन वाकडे व कर्मचारी हजर होते. प्रास्ताविक प्राचार्य लाठी यांनी केले. राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा पहिला सामना ईगल स्पोर्टस् नागपूर व ४ साहबजादे, नांदेड यांच्यामध्ये झाला. यात ४ विरुद्ध १ या गोल फरकाने नागपूरने हा सामना जिंकला. यवतमाळ पोलीस व इलेवन अमरावती या संघातील सामन्यात अमरावतीने ७ विरुद्ध १ अशा गोल फरकाने बाजी मारली. औरंगाबाद विरुद्ध डीएचए यवतमाळ या संघात झालेल्या सामन्यात ९ विरुद्ध 0 गोलफरकाने औरंगाबादने बाजी मारली. परभणी विरुद्ध आदर्श हिंगोली या सामन्यात हिंगोलीने ३ विरुद्ध १ ने बाजी मारली. या स्पर्धेला पंच म्हणून अमरावतीहून शफीउद्दीन, तर भोपाळमधून आबीद खान, शाहवरअली खान, अमजद खान, तसेच नागपूरहून गुणाचंद झा हे पंच म्हणून हॉकी स्पर्धेचे पाहत आहे. स्पर्धेसाठी केशव दुबे, नितेश कवाने, गोपी चोंढेकर,संंजय राठोड, शेख जावेद, नवनीत बगडिया, प्रवीण दुबे, हरिष कयाल, मनीष कयाल, मयूर कयाल, जितेंद्र भट्ट, उमेश जाधव आदी परिश्रम घेत आहेत.
हॉकी स्पर्धेचे थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:37 PM