नागनाथाच्या दर्शनासाठी उसळला जनसागर, तिसऱ्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 06:37 PM2018-08-27T18:37:08+5:302018-08-27T18:38:06+5:30
श्री नागनाथाच्या दर्शनासाठी आज तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी अलोट गर्दी केली.
औंढा नागनाथ (हिंगोली) : येथील आठवे जोतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी आज तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी अलोट गर्दी केली. भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर संस्थान व पोलिस विभागामार्फत चोख व्यवस्था करण्यात आली होती.
पवित्र श्रावण मास अंतिम चरणात आहे. आज नागनाथाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक शहरात दाखल झाले.राज्यातील मुबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे येथून तसेच मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा या ठिकाणाहून देखील आलेले भाविक दर्शनासाठी रविवारी रात्रीपासूनच रांगे उभे होते . भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर संस्थान व पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष प्रबंध करण्यात आले होते. या वेळी नागनाथ संस्थानच्या वतीने उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला. तसेच शिवसेना व मराठा शिवसैनिक संघटनेच्या वतीने भाविकांना फळे व फराळाचे वाटप करण्यात आले.