कुरुंदा : येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावाचे नाव उंचावण्याचे काम ग्रामस्थांनी
केले. या गावाच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’ चे संपादक चक्रधर दळवी यांनी केले.
कुरुंदा येथील ग्रामपंचायत बिनविरोध पार पडल्यानंतर गावाचे भूमिपुत्र, लोकमतचे संपादक चक्रधर दळवी यांनी शनिवारी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अच्युतराव भोसले, प्रा. दराडे, सभापती राजेश पाटील इंगोले, बाबुराव दळवी, सपोनि सुनील गोपीनवार, बाबुराव शेवाळकर, वामन दळवी, डॉ. प्रभाकर दळवी, शिवाजी इंगोले, हिरामण कांचनगिरे, शंकर देलमाडे, गणेश वटमे, मन्मथ सिध्देवार, गणपत काळे, शेख. श्रीराम इंगोले, प्रकाश इंगोले, शेख इस्माईल, नामदेव दळवी, मारोती काळे, बालाजी काळे, नजीब कुरेशी, गजानन इंगोले, मंगेश दळवी, नारायण आवसरमले, जावेद पठाण यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दळवी म्हणाले, कुरुंदा गावाने जो बदल केला आहे. तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. गावकऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे, तर गावाचा भूमिपुत्र असल्याने गावाचा मला अभिमान आहे. यावेळी ‘समग्र चक्रधर’ हे त्यांचे पुस्तक गावकऱ्यांना भेट म्हणून देण्यात आले. फोटो ११