जागेचा शोध घेता घेता बाजार समिती थकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:30 AM2018-04-25T00:30:37+5:302018-04-25T00:30:37+5:30
येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला. त्यामुळे शेवटी अपुऱ्या जागेतच हरभरा खरेदी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच एक नवीन खुशखबर म्हणजे नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर १५ मे पर्यंत खरेदी करण्यास वाढीव मुदत मिळाली आहे.
येथील बाजार समितीकडे जवळपास ८०० शेतकºयांची हरभरा विक्रीसाठी तर ६५० शेतकºयांची तूर विक्रीसाठी नोंद आहे. मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत बाजार समितीने नोंदणी झालेल्या शेतकºयांच्या तुरीची खरेदी न करताच केंद्राने गाशा गुंडाळला. त्यामुळे हिंगोली तालुक्यातील शेतकºयांनी काही गोंधळ केलेला नसला तरीही सेनगाव तालुक्यात केलेल्या गोंधळाने तूर खरेदीला वाढीव मुदत मिळाली आहे. तर हरभरा खरेदीलाही इतर ठिकाणावर गती आलेली असताना मात्र हिंगोलीतील बाजार समितीला हरभरा खरेदीसाठी अजून तरी जागा मिळालेली नाही. त्यामुळे बाजार समितीने आपले बस्तान जुन्या मोंढ्यातील एका अपुºया जागेत मांडण्याची वेळ आली आहे. तेथेही केवळ हरभराच खरेदी नव्हे; तर तुरीचीही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे हरभरा अन् तूर एकत्र खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्या ठिकाणी वाहने जाण्यासही जागा अपुरी असल्याने वाहने थांबविण्याचाही प्रश्न गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.
हिंगोली बाजार समितीकडे तुरीची खरेदी आली तेव्हापासून शांततेत खरेदी सुरु असली तरीही या ठिकाणी मात्र हरभरा आणि तूर खरेदीसाठी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुरीला वाढीव दिलेली मुदत कायम राहते की खरेदीच बंद ठेवण्याची वेळ येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या ८०० शेतकºयांपैकी सोमवारी १५ शेतकºयांना एसएमएस पाठवून हरभरा विक्रीस आणण्याचे सांगितले आहे. मात्र मंगळवारीही कोणत्याही शेतकºयाने हरभरा विक्रीस आणला नव्हता. त्यामुळे खरेदी केंद्राचे उद्घाटनही करता आले नाही, हे विशेष !
तुरीची नोंदणी झालेले शेतकरी मात्र तूर खरेदीचा आढावा घेऊन निघून जात होते. मात्र कोणीच तूर घेऊन न आल्याने दुपारी उशिरापर्यंत तुरीचीही खरेदी झालेली नव्हती. त्यामुळे बाजार समितीला आता शेतकºयांच्या मालाची प्रतीक्षा लागली आहे.
लोकमतने वारंवार पाठपुरावा केल्यामुळे मंगळवारी हरभरा खरेदेचा मुहुर्त मिळाला आहे. कोणतेही शेतकरी हरभर विक्रीस आले नसले तरीही मार्केट कमेटीने खरेदीस प्रारंभ झाल्याचे जाहिर केले.