पंतप्रधान मातृवंदना योजनेबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:24 AM2018-12-20T00:24:29+5:302018-12-20T00:25:11+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १९ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतंर्गत सुकाणू व सनिंयत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १९ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतंर्गत सुकाणू व सनिंयत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला तसेच गावपातळीवरील लाभार्थ्यांचे खाते पोस्ट आॅफिसमध्ये उघडण्याच्या सूचना दिल्या. पात्र लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री मातृवदंना योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, िडॉ. शिवाजी पवार, डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सतिश रुणवाल, चंद्रकांत सोनवने, हिंगोलीचे मुख्याधिकारी रामदास पाटील, वसमतचे मुख्याधीकारी आशोक साबळे, डॉ. सुनील देशमुख, डॉ. रौफ शेख, नामदेव कोरडे, डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. अझर देशमुख, डॉ. सुळे, प्रकाश वाघमारे, बापू सूर्यवंशी, प्रशांत तुपकरी उपस्थित होते.