उच्च पातळी बंधाऱ्यांना निधीसाठी खासदारांचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:21 AM2021-06-28T04:21:09+5:302021-06-28T04:21:09+5:30

मंत्री जयंत पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खा. पाटील यांनी कयाधू नदीवरील खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी ...

MP to Water Resources Minister for funding high level dams | उच्च पातळी बंधाऱ्यांना निधीसाठी खासदारांचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे

उच्च पातळी बंधाऱ्यांना निधीसाठी खासदारांचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे

Next

मंत्री जयंत पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खा. पाटील यांनी कयाधू नदीवरील खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी लिफ्ट करून इसापूर धरणात टाकण्यात येऊ नये, तर ते पाणी हिंगोली जिल्ह्यातच वापरण्यात यावे, अशी आग्रही भूमिका घेतली .

हिंगोली जिल्ह्याची सिंचन क्षमता अत्यल्प आहे, अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यात उपसा सिंचन योजना मंजूर करणे गरजेचे आहे. उच्च पातळी बंधारे आणि प्रलंबित जलविद्युत प्रकल्प पूर्ण करून साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास आगामी काळात याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल याकरिता खा. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाची परिस्थिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. हिंगोली जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा, येलदरी आणि सिद्धेश्वर हे मोठे प्रकल्प आहेत; परंतु याचा लाभ जिल्ह्यास मिळत नाही. त्यामुळेच या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात यावी, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पावरील उच्च पातळी बंधारे, कळमनुरी तालुक्यातील सापळी धरणाऐवजी नांदापूर, सालेगाव, डिग्रस, कोंढूर आणि कसबे धावंडा हे उच्च पातळीचे साखळी बंधारे मंजूर करण्यात यावेत, कौठा तांडा, ता. हिमायतनगर - सहस्त्रकुंड ता. किनवट येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बहुद्देशीय जलविद्युत प्रकल्प तत्काळ सुरू करण्यात यावा. पूर्णा प्रकल्पांतर्गत पूर्णा सिद्धेश्वर धरणाखाली पूर्णा नदीवर औंढा तालुक्यातील पोटा, वसमत तालुक्यातील जोड परळी, पिंपळगाव कुटे आणि परभणी जिल्ह्यातील ममदापुर येथे चार उच्च पातळी बंधारे बांधण्यात यावेत, तसेच हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस आणि सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील साठवण तलावांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. यासह वसमत तालुक्यातील पिंपळखुटा व बोराळा येथील साठवण तलावाची कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत. हिंगोलीच्या लघु पाटबंधारे विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत यासह विविध मागण्यांचे निवेदन खा. पाटील यांनी दिले. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.

Web Title: MP to Water Resources Minister for funding high level dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.