मागील काही दिवसांपासून पेट्राेल, डिझेल व गॅसच्या किमती वाढतच चालल्या आहेत. मोदी सरकारने सात वर्षांपूर्वी इंधन दरवाढीच्या विषयावर रणकंदन करून जनतेची दिशाभूल करीत सत्ता संपादन केली. मात्र, मागील काळात सातत्याने इंधन दरवाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून जनता महागाईत भरडली जात असल्याचा आरोप करून जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी ही दरवाढ केंद्र शासनाने कमी करावी, अशी मागणी केली. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे,युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, महिला जिल्हाध्यक्षा सुमित्रा टाले, संजय दराडे, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, सुजय देशमुख, अमित कळासरे, स्वप्निल गुंडेवार, संतोष गुठ्ठे, संचित गुंडेवार, तेजस पवार, इरफान पठाण, केशव शांकट, प्रफुल सोनुने आदी उपस्थित होते.
इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:19 AM