जिल्ह्यात कोरोनाचा एक नवा रुग्ण ; ७ बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:41+5:302021-07-03T04:19:41+5:30
रॅपिड अँटिजन तपासणीत हिंगोली परिसरात १ रुग्ण आढळून आला आहे. ७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडून देण्यात ...
रॅपिड अँटिजन तपासणीत हिंगोली परिसरात १ रुग्ण आढळून आला आहे. ७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डामध्ये भरती असलेल्या १२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू ठेवण्यात आले आहे. तर ३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवले आहे. २ जुलै रोजी १५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ९४८ रुग्ण झाले असून त्यापैकी १५ हजार ५३३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. आजघडीला जिल्ह्यात एकूण ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३८३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.