पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:39+5:302020-12-24T04:26:39+5:30

कळमनुरी तालुक्‍यातील १०९ ग्रामपंचायतच्या ८७५ सदस्यांसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. या सर्व ग्रामपंचायतीसाठी १ लाख ४० हजार २०९ ...

No candidature application on the first day | पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

Next

कळमनुरी तालुक्‍यातील १०९ ग्रामपंचायतच्या ८७५ सदस्यांसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. या सर्व ग्रामपंचायतीसाठी १ लाख ४० हजार २०९ मतदार आहेत. त्यात ७३,४२१ पुरुष व ६६,७८८ महिला मतदार आहेत. ३३८ प्रभागासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी ३५३ मतदान केंद्रे आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राकरिता उमेदवार धावपळ करीत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी ३० टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आलेली आहे. एका टेबलवर तीन ते चार ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारल्या जाणार आहे. मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.

Web Title: No candidature application on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.