वसमत येथील नरेंद्र मेडिकल स्टोअर्स ॲण्ड जनरलच्या मालकाने मात्र साठा व्यवस्थित कळविला नव्हता. ४२ इंजेक्शन उपलब्ध झाले असताना १२ इंजेक्शनच मिळाल्याचे कळविले होते. त्यानंतर या ठिकाणी दस्तावेज तपासणी केल्यावर ही बाब उघड झाली. तेव्हा पूर्ण ४२ इंजेक्शनची नोंद झाली. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी संबंधितास नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
इंजेक्शनचा अल्पपुरवठाच
विविध पक्ष, लोकप्रतिनिधींकडून इंजेक्शन मिळवून दिले, मिळाल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरीही प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. इंजेक्शनचा पुरवठा अल्पप्रमाणातच होत आहे. नियंत्रण समितीने स्टॉकची माहिती घेणे व तो कळविणे बंधनकारक केल्यामुळे तरी समन्यायी वाटप होत आहे. मात्र, शासकीय रुग्णालयांना मिळणाऱ्या इंजेक्शनचा वापरही जेथे लोकप्रतिनिधींचा दबाव येतो, तेथेच होत असल्याचा आराेप होत आहे. याकडेही जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. पॉलिटिकल पॉवर असेल तरच रेमडेसिविर मिळत असल्याच्या या आरोपांना ब्रेक लावण्यासाठीही यंत्रणेची गरज आहे.