मतदान केंद्रावर गैरहजर ५ बीएलओंना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:46 AM2019-02-24T00:46:13+5:302019-02-24T00:47:07+5:30
मतदार नोंदणी विशेष मोहीमेदरम्यान मतदान केंद्रावर गैरहजर ५ बीएलओं (केंद्रस्तरीय अधिकारी) यांना उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी २३ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावल्या आहेत.
कळमनुरी : मतदार नोंदणी विशेष मोहीमेदरम्यान मतदान केंद्रावर गैरहजर ५ बीएलओं (केंद्रस्तरीय अधिकारी) यांना उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी २३ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाने १९ फेब्रुवारी २०१९ अन्वये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ विचारात घेऊन विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी झाली नाही. अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने २३ व २४ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीमेचा यशस्वी प्रभावी कार्यक्रम आयोजित केला आहे. बीएलओंनी २३ व २४ फेब्रुवारी रोजी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. २३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सिंदगी, नांदापूर येथील ५ मतदान केंंद्रांना एसडीएम प्रशांत खेडेकर यांनी भेटी दिल्या. भेटी दरम्यान या मतदान केंद्रावरील ५ बीएलओं गैरहजर होते. त्यामुळे खेडेकर यांनी एम.डी.कºहाळे, डी.के.टेकाळे, सी.एम.गडगिळे, एस.एस.कल्याणकर, एस.बी.कोठुळे या ५ बीएलओंना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी निवडणूक विषयक मतदार नोंदणीच्या कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यामुळे या बीएलओंना नोटीसा बजावून आपल्या विरूद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार गुन्हा का दाखल करण्यात येवू नये, याबाबत आपल्या लेखी खुलासा समक्ष नोटीस मिळताच दोन दिवसात सादर करण्याचेही नोटीसीत नमूद आहे.