... अन्यथा ५० हजारांचा दंड आकारला जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:11 AM2019-01-06T00:11:31+5:302019-01-06T00:12:29+5:30
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ च्या कलम ४(१) नुसार कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तक्रारींची सखोल चौकशी व त्याचे निवारण करण्याकरिता तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ च्या कलम ४(१) नुसार कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तक्रारींची सखोल चौकशी व त्याचे निवारण करण्याकरिता तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. सदर तक्रार समिती स्थापन न केल्यास उपरोक्त कायद्यात कलम २६ अंतर्गत रु.५० हजार दंड आकारण्याची तरतूद दर्शविली आहे.
याकरिता जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी कलम २६ व कलम ४(१) चे गांभीर्य लक्षात घेऊन खाजगी, शासकीय, निमशासकीय, हॉटेल, खानावळ, भोजनालय, लॉज, मंगल कार्यालय येथे ही समिती तात्काळ स्थापन करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकाºयांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला एस-७, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.