हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:39 AM2018-04-24T00:39:57+5:302018-04-24T00:39:57+5:30

घाण पाण्यावरील, घोंगावणाऱ्या डासांच्या अ‍ॅनॉफिलिस जातीच्या मादीच्या दंशातून हिवताप पसरतो. त्यामुळे परिसरातील सर्व नाल्या वाहत्या करणे आवश्यक असून साचलेली डबकी, खड्ड्यांत पाणी साचू दिले नाही तर, हिवताप, डेंगू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या रोगांना प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे याबाबत सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

 Precautions to prevent the spread of malaria | हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी

हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : घाण पाण्यावरील, घोंगावणाऱ्या डासांच्या अ‍ॅनॉफिलिस जातीच्या मादीच्या दंशातून हिवताप पसरतो. त्यामुळे परिसरातील सर्व नाल्या वाहत्या करणे आवश्यक असून साचलेली डबकी, खड्ड्यांत पाणी साचू दिले नाही तर, हिवताप, डेंगू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या रोगांना प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे याबाबत सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षी आरोग्य विभागातर्फे जागतिक हिवताप दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने २५ एप्रिल रोजी हिंगोली शहरात जनजागृती मोहीम व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हिवतापाच्या धोक्यामुळे दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. प्रत्येक गावात व शहरात हिवतापाचा कमी-अधिक धोका असतोच त्यामुळे हा आजार प्रत्येकांनी जाणून घेणे-समजून घेणे, योग्य ती खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रौढांपेक्षा मुलांमध्ये हिवतापाचे व मृत्युचे प्रमाणही जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हिवताप अधिकारी जी. के. चव्हाण यांनी केले.
हिवतापाचा प्रसार अ‍ॅनॉफिलीस डासाच्या मादीपासून होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या , कालवे इत्यादीमध्ये. हिवताप प्रसारक अ‍ॅनॉफिलीस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात . तेथे वाढ होऊन डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये जातात व तेथे त्याची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला हिवतापाची लक्षणे - थंडी वाजून ताप येणे होय. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखते व बºयाचवेळा उलट्याही होतात. हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्तनमुना घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. हिवताप उपचार सुधारित उपचार पध्दती रक्त नमुना संशयित हिवताप रुग्णाचा रक्तनमुना घेऊन हिवताप रुग्ण दूषित आल्यावर त्यांना वयोगटानुसार क्लोरोक्वीन गोळ्यांची पूर्ण मात्रा दिली जाते. सूक्ष्मदर्शकाद्वारे रक्तनमुने तपासणीअंती हिवतापाचे निश्चित निदान झाल्यावर संबंधित रुग्णास जंतूच्या प्रकारानुसार योग्य ते औषधोपचार करण्यात येतात. कीटकजन्य रोगांना प्रतिबंध - हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया हे सर्व रोग स्वच्छ पाण्यात डास अंडी घालून त्यापासून डास अळी व नंतर डास तयार होतात याला प्रतिबंध करण्यासाठी घरातील सर्व पाणीसाठे आठवड्यातून एक दिवस धुवून पुसून कोरडे करणे आवश्यक आहे. घाण पाण्यात क्युलेक्स डासाची मादी अंडी घालते व त्यापासून हत्तीरोगाची लागण होते.

Web Title:  Precautions to prevent the spread of malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.