लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बसस्थानकात नेहमीच चोरी किंवा पाकीटमारीच्या घटना घडतात. येथे दोन पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती आहे. मात्र ते अधून-मधून कर्तव्य बजावतात. त्यामुळे चोरट्यांनाही वचक राहिला नाही. स्थानकातील पोलीस चौकी तर गायबच झाली आहे. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकात ये-जा करणाºया प्रवाशांची नेहमी गर्दी असते. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसची वाट बघत स्थानकात थांबावे लागते. यावेळी अनेक टवाळखोर स्थानकात फिरताना दिसत आहेत. पोलिसांनाही बसण्याची स्थानकात सुविधा नसल्यामुळे त्यांना परिसरातच भटकंती करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी चौकीची सुविधा करणे गरजेचे आहे. मात्र पोलीस चौकीच्या व्यवस्थेसाठी आगाराकडे विशेष निधीची तरतूद नसल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. याकडे पोलीस प्रशासन तसेच परभणी येथील एसटीच्या विभागीय कार्यालयातील संबधित अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी आहे. ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.स्थानकातील पोलीस चौकीच गायब...हिंगोली बसस्थानकात पुर्वी पोलिसांना बसण्यासाठी चौकीची व्यवस्था होती. परंतु चौकीही स्थानक परिसरात दिसत नाही. वेळोवेळी मागणी करूनही चौकीची व्यवस्था झाली नाही. शिवाय नवीन चौकीसाठी लागणारा खर्चही आगारातर्फे करण्याची तरतूद नाही. त्यामुळे पोलीस चौकीचाही प्रश्न आहे. पोलिसांच्या चौकी संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांनी सांगितले. किंवा स्थानक परिसरात सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असेही ते म्हणाले. परंतु चौकीची सुविधा झाल्यानंतर तरी येथील चोरींच्या घटनांना आळा बसेल का? असा प्रश्न प्रवाशांतून आहे.
बस प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:26 PM