सोमठाणा येथे जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:47+5:302021-08-15T04:30:47+5:30

वसमत तालुक्यातील सोमठाणा येथील एका झोपडीत झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी १४ ...

Raid on gambling den at Somthana | सोमठाणा येथे जुगार अड्ड्यावर छापा

सोमठाणा येथे जुगार अड्ड्यावर छापा

Next

वसमत तालुक्यातील सोमठाणा येथील एका झोपडीत झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा-एक वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी १० जण झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ६ हजार ८७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सपोउपनि आनंदा वाळके यांच्या फिर्यादीवरून गोपाळ प्रकाश ढगे, गोरखनाथ संभाजी कदम, राजेश भीमराव जाधव, गोविंद प्रकाश ढगे, फुलाजी बाबूराव कदम, छत्रगुण विश्वनाथ भिसे, बेगाजी बाबूराव जाधव, चक्रधर परसराम जाधव, कृष्णा विलास जगताप, रूखमाजी जाधव (सर्व रा. सोमठाणा) या जुगाऱ्यांवर कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास

वाळू चोरटे पीकअप वाहनासह मोबाईल जागेवर सोडून पळाले

हिंगोली : वसमत तालुक्यातील किन्होळा ते बोरगाव रोडवरील आसना नदीतून वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले वाळू चोरटे पोलिसांना पाहताच पळून गेले. यावेळी वाळू चोरट्याने जागेवरच पीकअप वाहन, मोबाईल व वाळू चोरीसाठी आणलेले साहित्य जागेवरच सोडले. ही कारवाई १४ ऑगस्ट रेाजी पहाटे २ वाजताच्या सुमारास केली.

वसमत तालुक्यातील किन्होळा ते बोरगाव रोडवरील आसना नदीतून वाळूचा अवैध उपसा करण्यासाठी काही जण वाहनासह गेले असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या पथकाने १४ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास पोलीस आसना नदी परिसरात दाखल झाले. यावेळी एक पीकअप वाहनात दोघे जण वाळू चोरीसाठी आले होते. पोलिसांना पाहताच वाळू चोरीसाठी आलेले पळून गेले. यावेळी पोलिसांनी एक पीकअप वाहन, सहा टोपले, तीन खोरे, वाळू चाळण्याची चाळणी, दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना एम.व्ही. आडे करीत आहेत.

Web Title: Raid on gambling den at Somthana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.