उपजिल्हाधिका-यांच्या खुर्चीला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:41 PM2018-01-11T23:41:37+5:302018-01-11T23:42:02+5:30
केंद्रात येऊ घातलेल्या तीन तलाक कायद्याविरोधात येथील मुस्लिम समाजाच्या वतीने ११ जानेवारी रोजी कळमनुरी येथे कडकडीत बंद ठेवून हिंगोली- नांदेड राज्य रस्त्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी महिला उपजिल्हाधिकाºयांच्या दालनात गेल्या असता तेथे उपजिल्हाधिकारी नसल्याने महिलांच्या वतीने खुर्चीला निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : केंद्रात येऊ घातलेल्या तीन तलाक कायद्याविरोधात येथील मुस्लिम समाजाच्या वतीने ११ जानेवारी रोजी कळमनुरी येथे कडकडीत बंद ठेवून हिंगोली- नांदेड राज्य रस्त्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी महिला उपजिल्हाधिकाºयांच्या दालनात गेल्या असता तेथे उपजिल्हाधिकारी नसल्याने महिलांच्या वतीने खुर्चीला निवेदन देण्यात आले.
निवेदन घेण्यासाठी कार्यालयात उपजिल्हाधिकारी नसल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुस्लिम धर्माच्या शरियतमध्ये केंद्र शासनाने हस्तक्षेप करू नये, तीन तलाकबद्दल कायदा संमत करू नये, तसेच ट्रिपल तलाकच्या कायद्याला मंजुरी न देता शरियतमध्ये हस्तक्षेप करू नये, हज यात्रेसाठी एकट्या मुस्लिम महिलेस जाण्याची परवानगी देवू नये आदी प्रमुख मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
शहरातील रजा मैदान येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर या ठिकाणी आयोजित सभेत तस्लीम रिज्वीया, फिरदोस फातेमा, डॉ. गजाला यास्मीन, हबीबा नाज, महेवीश फातेमा, शिरीन फातेमा, मुस्कान फातेमा आदी महिलांनी मनोगत व्यक्त करून तीन तलाक कायद्याचा कडाडून विरोध दर्शविला.
केंद्र शासनाने शरियतमध्ये ढवळाढवळ करू नये, कोणत्याही परिस्थितीत तीन तलाकचा कायदा होऊ देणार नाही, असे यावेळी ठणकावून सांगितले.
यावेळी तहसील कार्यालया समोरील हिंगोली- नांदेड राज्य रस्त्यावर महिला व पुरूषांनी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी महिला उपविभागीय कार्यालयात गेल्या असता त्या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर उपस्थित नव्हते.
एवढा मोठा मोर्चा काढून आमच्या मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने मुस्लिम बांधवांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे ८ ते १० दिवसांपूर्वी प्रशासनाला याबाबत माहिती देवूनही वरिष्ठ अधिकारी उपस्थित का राहिले नाहीत? असा सवाल निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांनी यावेळी उपस्थित केला.
कार्यालयात अधिकारी नसल्याने मुस्लिम बांधवांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जोपर्यंत अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा घेतला. तर प्रशासन जाणिवपूर्वक आमच्या समाजासोबत खेळी खेळत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, प्रेमलता गोमाशे यांनी मध्यस्थी करून मोर्चाकºयांना शांत केले. अधिकाºयांची अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करूनही ते न आल्यामुळे महिलांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत उपजिल्हाधिकाºयांच्या खुर्चीला निवेदन दिले.
त्यानंतर मुस्लिम महिलांच्या वतीने फौजदार प्रेमलता गोमाशे यांना निवेदन देण्यात आले.
शिस्तबद्ध मोर्चाचे आयोजन
मुस्लिम समाजाच्या वतीने ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात काढण्यात आलेला मूक मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी हातामध्ये विविध प्रकारच्या घोषणा लिहलेले फलक हातात घेवून उत्स्फूर्तपणे आज आयोजित केलेल्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवून ट्रिपल तलाक कायद्याचा विरोध केला.
नांदेड- हिंगोली राज्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कळमनुरी शहरातील हिंगोली- नांदेड राज्य रस्त्यांवर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे सदर मार्गावर जवळपास तीन ते चार किमी. पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. परिणामी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कळमनुरी येथील मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, सपोनि. सुधाकर आडे, फौजदार पठाण, जागे, प्रेमलता गोमाशे, बांगर, उरेवार, राठोड यांच्यसह पोलीस कर्मचाºयांनी बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, राज्य रस्ता पूर्णपणे बंद असल्यामुळे येथील बसस्थानकात बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आंदोलनाची अनेक प्रवाशांना कल्पना नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
कडकडीत बंद : मुस्लिम बांधवांनी शहर कडकडीत बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदविला. तसेच मुस्लिम महिलांसह अबालवृद्धही मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. दरम्यान, मोर्चात १० ते १२ हजार समाज बांधवांनी सहभाग नोंदवून ट्रिपल तलाक कायदा व शासनाचा शरीयतमधिल हस्तक्षेपाचा विरोध दर्शविला.
मुस्लिम समाजाच्या वतीने ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात काढण्यात आलेला मूक मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी हातामध्ये विविध घोषणांचे फलक घेऊन सहभाग नोंदविला.
नगरसेवक खाजा बागवान यांच्या वतीने शहरातील भाजीमंडी, जुने बसस्थानक परिसरातील मोर्चेकºयांना पिण्यासाठी पाणी पाऊचची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी मोर्चेकºयांना नफिस बागवान, हनिफ बागवान, म. मुख्तार म. हकीम आदींची उपस्थिती होती.
या मूक मोर्चाबाबत मुस्लिम समाजाच्या वतीने जनजागृती करण्यात आली होती. यासाठी कॉर्नर बैठकाही घेण्यात आल्या होत्या. तसेच मोर्चा हा नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, यासाठी शहरातील विविध भागातून लाऊडस्पीकरद्वारे सूचना देण्यात येत होत्या. दरम्यान, मोर्चात जवळपास १० ते १२ हजार मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविल्याची माहिती आहे. एकंदरीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या मोर्चाचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते.
उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको
४तीन तलाक कायद्याच्या विरोधात कळमनुरी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आज दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हिंगोली- नांदेड राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलनात युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. दरम्यान, तब्बल तीन तास चाललेल्या आंदोलनाला समाज बांधवांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.