लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : अनुकंपासेवानिवृत्ती वेतन मिळावे, यासाठी सेवानिवृत्त तलाठी ५० वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. माहिती अधिकाराअंतर्गतही खंडपीठात अपील केले होते. त्यांचे अपील मंजूर झाले आहे. आताही प्रत्यक्ष निवृत्ती वेतन कशी हातात पडते, याची प्रतीक्षा कायमच आहे.वसमत तालुक्याचे हयातनगर तलाठी सज्जाचे तत्कालीन तलाठी प्रल्हाद रावले यांच्यावर १९६६ मध्ये फौजदारी खटला दाखल झाला होता. त्याचा निकाल १९६७ मध्ये लागला. त्यात त्यांना दोषी ठरवून ५० रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत एक दिवस साधी शिक्षा झाली होती. निकालपत्रात न्यायाधीशांनी धारकाकडून सरकारचे नुकसान झालेले नाही, असेही मत व्यक्त केले होते. यानंतर त्यांना दहा वर्षानंतर सेवेतून कमी करण्याचे आदेश बजावत निलंबित केले. त्यावेळी त्यांचा सेवाकाळ २१ वर्षे १४ दिवसांचा होता.त्यामुळे सेवानिवृत्ती वेतनासाठी रावळे यांनी पाठपुरावा सुरू केला. पेन्शन अदालत, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. २००६ मध्ये विभागीय आयुक्तांनी हे प्रकरण समजून घेवून नियमानुसार अनुकंपानिवृत्त वेतन मिळण्याची कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. यात अद्याप अंतिम कारवाई झालेली नाही. रावळे यांनी हक्कासाठी संघर्ष सुरूच ठेवला.माहिती अधिकारांतर्गत अर्ज दिले. अपील केले.अपीलाचा निकाल माहिती आयोग खंडपीठाने रावळे यांच्या बाजूने दिला. निकालाची प्रत त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल केली. त्यांचे सेवानिवृत्ती वेतन मंजुरीच्या संबंधीचा प्रस्ताव दाखल आहे. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याने वयोवृद्ध सेवानिवृत्त तलाठ्यास हेलपाटे मारावे लागत आहेत.
सेवानिवृत्त तलाठ्याचे अपील मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:08 AM