रोहित्रांचा खच पुन्हा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:06 AM2019-04-27T00:06:48+5:302019-04-27T00:07:32+5:30
काही दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यात उपकेंद्रांतीलच ट्रान्सफार्मर जळाल्याने एकदाच ९ केएल आॅईल लागले. त्यामुळे पुन्हा आॅईलचा तुटवडा निर्माण झाल्याने नादुरुस्त रोहित्रांचा खच पडल्याचे चित्र हिंगोली येथे पहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सिंचनासाठी मात्र बहुतांश ठिकाण गावठाण डीपी मिळत नसल्याची बोंब पुन्हा होत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : काही दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यात उपकेंद्रांतीलच ट्रान्सफार्मर जळाल्याने एकदाच ९ केएल आॅईल लागले. त्यामुळे पुन्हा आॅईलचा तुटवडा निर्माण झाल्याने नादुरुस्त रोहित्रांचा खच पडल्याचे चित्र हिंगोली येथे पहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सिंचनासाठी मात्र बहुतांश ठिकाण गावठाण डीपी मिळत नसल्याची बोंब पुन्हा होत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळी चित्र आहे. सिंचनाच्या पट्ट्यात मोडणाºया वसमतलाच यंदा पाणी नसल्याने डीपींसाठी तेवढी ओरड नाही. मात्र दुष्काळामुळे वीज देयके भरायलाही शेतकऱ्यांची उदासीनता दिसत आहे. तर गावठाणची देयके भरूनही जळालेले रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्याने ही वेगळी बोंब आहे. मागील काही दिवसांपासून जळालेल्या रोहित्रांची संख्या पुन्हा वाढत चालल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार कृषीचे ९१ डीपी जळाले असून त्यापैकी १३ ठिकाणच्या लोकांनी थकबाकी भरली आहे. तर गावठाणचे २९ डीपी जळाले असून त्यापैकी ८ ठिकाणची थकबाकी भरली आहे. यात ६३ केव्हीएचे ५२ आहेत. तर १00 केव्हीएचे ३९ डीपी आहेत.
जळालेले डीपी दुरुस्त करून देण्याचे काम सुरू आहे. मात्र आॅईलची समस्या सुटेपर्यंत ज्येष्ठतेनुसार प्रतीक्षा यादीतील काही जणांना रोज डीपी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात थकबाकी भरणाºयांना प्राधान्य दिले जात असून इतरांना त्यानंतर डीपी दिला जात आहे. तर गावठाणच्या डीपींबाबत ओरड होत असल्याचे विचारल्यावर सध्या सिंचनाची सोय नसल्याने जेथे मागणी नाही, असे डीपी टाळून गावठाणचे डीपी दुरुस्तीस प्राधान्य दिले जात असल्याचेही उपकार्यकारी अभियंता अ.जब्बार यांनी सांगितले.
गावठाणची बोंब : ८१ सिंगल फेज बंद
सिंगल फेजच्या जळालेल्या डीपींची संख्या ८१ एवढी आहे. यापैकी २१ ठिकाणच्या ग्रामस्थांनी थकबाकीची रक्कमही भरली आहे. मात्र रोहित्र भरून देण्याची गती आॅईलच्या तुटवड्यामुळे पुन्हा मंदावली आहे.
काही दिवसांपूर्वी मंजूर झालेले आॅईल जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात झालेल्या वादळी वाºयादरम्यान नादुरुस्त झालेल्या उपकेंद्रांतील डीपीसाठी वापरण्यात आले होते.
यामध्ये जवळपास ९ केएल आॅईल लागल्याने आता पाच केएल शिल्लक असून त्यात २५ ते ३0 डीपी दुरुस्त करू शकणार आहेत. आॅईल देण्याची मागणी केली असून मंजुरीही मिळाली आहे.
सध्याही डीपी दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र लवकरच आॅईल उपलब्ध झाल्यानंतर कामात गती येईल. त्यानंतर गावठाणचे बहुतांश डीपी मिळतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली.