जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या नियोजनाखाली या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित आरटीपीसीआर कॅम्पमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन भायेकर यांनी प्रारंभी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. त्यानंतर इतर जवळपास ३५ कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली.
यावेळी उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. गोपाल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नामदेव कोरडे, डाॅ. सतीश रुनवाल, डाॅ. सुनील देशमुख, वैद्यकीय अधिकारी डाॅ. इंदू पेरके, डाॅ. अश्विनी नवघरे, डाॅ. कैलास पवार, वैशाली काईट, सुजाता इंगोले, अधिपरिचारीका पूजा शिंगनकर, औषध निर्माण अधिकारी राहुल घुगे, रावसाहेब वाघोळे, वसंत पवार आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
फोटो ८