Santosh Banger: आमदार संतोष बांगर पुन्हा आक्रमक, व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 04:11 PM2022-08-15T16:11:39+5:302022-08-15T16:13:54+5:30

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी कामगारांसाठी सरकारने सुरू केलेल्या मध्यान्ह भोजन योजनेतील भ्रष्टाचारावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे

Santosh Banger: MLA Santosh Bangar again aggressive, put the manager in earshot in hingoli; The video went viral on social media | Santosh Banger: आमदार संतोष बांगर पुन्हा आक्रमक, व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली; Video व्हायरल

Santosh Banger: आमदार संतोष बांगर पुन्हा आक्रमक, व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली; Video व्हायरल

googlenewsNext

हिंगोली - राज्यातील सत्तांतर बदलाच्या राजकारणावेळी भूमिका बदलामुळे चर्चेत ठरलेले आमदार संतोष बांगर अलिकडच्या काळात चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं कौतुक केल्यामुळे मतदारसंघातही त्यांची वाहवा होत आहे. कोरोना काळात आपली एफडी मोडून रेमडिसीवीर इंजेक्शनची पूर्तता केल्यामुळेही ते कार्यकर्त्यांमध्ये लक्षवेधी ठरले होते. तर, आपल्या विधानांमुळेचही ते चर्चेत असतात. आता, आमदार बांगर यांनी चक्क एका व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्याने पुन्हा व्हायरल झाले आहेत. 

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी कामगारांसाठी सरकारने सुरू केलेल्या मध्यान्ह भोजन योजनेतील भ्रष्टाचारावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. मध्यान्ह भोजन योजनेतून कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एका उपहारगृहाची पाहणी करायला गेलेल्या आमदार बांगर यांचा निकृष्ट दर्जामुळे पारा चांगलाच चढला. संतप्त झालेल्या आमदारांनी या उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनीह याकडे लक्ष देण्याचे आवाहन केलं आहे.

राज्य सरकारच्या कामगार मध्यान्ह भोजन योजनेतून नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत कामगारांना भोजन दिले जाते. त्यासाठी, सरकारने मेन्यूही ठरवले आहेत. मात्र, करपलेल्या चपात्या, न शिजलेली डाळ आणि हलक्या तांदळाचा भातच या कामगारांना दिला जात असल्याचं आमदार बांगर यांनी उघडकीस आणलं. तर, हे पुरविण्यात येत असलेलं जेवणही निकृष्ट दर्जाचंच असल्याचा पर्दाफाश बांगर यांनी केला आहे. यासंदर्भात जाब विचारत असताना अबोल झालेल्या व्यवस्थापकाच्या थेट कानशिलातच त्यांनी लगावली. तसेच, ज्या कंत्राटदाराला हे मध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम देण्यात आलं आहे, त्याची चौकशी करुन कारवाई करावी, संबंधित अधिकऱ्यांना निलंबित करावं, अशी मागणीही बांगर यांनी केली आहे. 

Web Title: Santosh Banger: MLA Santosh Bangar again aggressive, put the manager in earshot in hingoli; The video went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.