सापांना वाचवू; सर्पमित्रांनी केले आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:59+5:302021-06-02T04:22:59+5:30
सापांचे संरक्षण करण्यासाठी आजमितीस जिल्ह्यात विजयराज पाटील, विश्वांबर पटवेकर, ओम जाधव, स्वप्निल परसवाळे, शेख सलीम, आनंद चोपडे, विजय शिंदे, ...
सापांचे संरक्षण करण्यासाठी आजमितीस जिल्ह्यात विजयराज पाटील, विश्वांबर पटवेकर, ओम जाधव, स्वप्निल परसवाळे, शेख सलीम, आनंद चोपडे, विजय शिंदे, जावेद पठाण, राम परीया, विकी दयाळ, तानाजी जाधव, दीपक रणवीर, विशाल सरकटे, आकाश होकर्णे, लखन सरवर, सोयबाज पठाण, रणवीर टाक आदी सर्पमित्र कार्यरत आहेत.
‘चला सापांना वाचवू’ सर्पमित्रांची मोहीम
साप दिसल्यास त्याला मारण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सापांच्या जाती नष्ट होत आहेत. थोडक्यात सांगायाचे झाल्यास, सर्वच साप हे विषारी नसतात. ग्रामीण भागात तर सर्वच सापांना विषारी समजून मारले जात आहे. साप दिसल्यास नागरिकांनी जिल्ह्यातील सर्पमित्रांशी संपर्क साधावा. ‘चला सापांना वाचवू’ या मोहिमेंतर्गत सर्पमित्र हे नागरिकांना विनामूल्य सेवा देतील. पर्यायाने सापांचा प्राण वाचेल.
- मुरलीधर कल्याणकर, सर्पमित्र, हिंगोली.