या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्वच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सहभागी होता येईल, असे आवाहन करण्यात आले असून, कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालनही केले जाणार आहे. शाळेच्या गेटवर सर्वच विद्यार्थ्यांची कोरोना तपासची तपासणी करण्यात येणार आहे. विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तसेच विजेत्यांना आकर्षक पारितोषिके वितरित केली जाणार आहेत. हा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम तीन टप्प्यांत होणार असून, विज्ञानावर आधारित विज्ञान प्रयोग शाळेत ट्रेझर हंट ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाचा जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याध्यापक के.जे. जोसेफ, विज्ञान शिक्षक अनिता आनंदन, विजय वसू, सचिन डोईफोडे यांनी केले आहे.
हिंगोलीत ८ फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:51 AM