दफन विधीची जबाबदारी स्वीकारली बाळापूरच्या युवकांनी....
__________
सदर मयत मुलीचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता. तिच्या डोक्याचे सर्व केस गेले होते. शरीराचे चामडे आणि मांसही सुटले होते. प्रेताची प्रचंड दुर्गंधी येत होती. अशा अवस्थेत प्रारंभी कामठा फाटा येथील गायरान जमिनीत दफनविधी करण्याचे ठरले होते. परंतु सदर मयत मुलीचे कुटुंबीय हे राजस्थान येथील रहिवासी असल्याने व ते दोघे तिथेच उपस्थित असल्याने, तसेच दु:ख वियोगाने व्याकूळ झाले होते. अंत्यविधीसाठी पुढाकार घेणारे कोणीच नव्हते. पोलिसांच्या पुढाकाराने दफनविधी आटोपण्यात येणार होता. परंतु बाळापूरच्या मुस्लिम युवकांनी यात पुढाकार घेऊन बाळापूर येथील स्मशानभूमीत तिचा दफनविधी पूर्ण करण्याचे कार्य सुरू केले आहे. बाळापूरच्या मुस्लिम युवकांनी पोलिसांना मदतीचा हात देत मयत मुलीचा दफनविधी उरकला. माणुसकीचे हे रूप दिलासा देणारे ठरले.