रेशीम उत्पादक जिल्हा कचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:55 PM2018-01-06T23:55:47+5:302018-01-06T23:55:59+5:30
एकीकडे दिवसेंदिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीत पाहिजे तसे उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे हाच शेतकरी उत्पन्नवाढीसाठी रेशीम उद्योगाकडे वळला असता हिंगोली येथील रेशीम उद्योग कार्यालय याची नोंदसुद्धा करीत नसल्याने आक्रमक झालेल्या शेकडो शेतकºयांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना अजित मगर यांच्या उपस्थितीत निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एकीकडे दिवसेंदिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीत पाहिजे तसे उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे हाच शेतकरी उत्पन्नवाढीसाठी रेशीम उद्योगाकडे वळला असता हिंगोली येथील रेशीम उद्योग कार्यालय याची नोंदसुद्धा करीत नसल्याने आक्रमक झालेल्या शेकडो शेतकºयांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना अजित मगर यांच्या उपस्थितीत निवेदन दिले आहे.
कोणताही व्यवसाय असो याला जोडधंदा आवश्यक आहे. सद्यस्थितीत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खर्च करूनसुद्धा उत्पन्न निघत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीम उद्योगाकडे वळला आहे. मात्र शेतकºयांनी नोंदणी येथील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय घेत नसल्याने येथील अधिकारी व कर्मचारी शेतकºयास साथ देत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शेतकºयांनी जिल्हाधिकारी यांना रेशीम उद्योजक शेतकºयांनी नोंदणी करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जि.प.सदस्य अजित मगर यांच्यासह शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.