साहेब, ऑक्सिजन, बेडसंदर्भात तक्रार करायची तरी कुणाकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:53+5:302021-04-20T04:30:53+5:30
हिंगोली : ऑक्सिजन, रेमडेसिविर, ऑक्सिजन बेडसंदर्भात तक्रारी आहेत. परंतु, याविषयीची तक्रार कुणाकडे करावी? हा प्रश्नचं आहे. शासनाने सूचना केल्यास ...
हिंगोली : ऑक्सिजन, रेमडेसिविर, ऑक्सिजन बेडसंदर्भात तक्रारी आहेत. परंतु, याविषयीची तक्रार कुणाकडे करावी? हा प्रश्नचं आहे. शासनाने सूचना केल्यास नगर परिषदेमध्ये ‘वाॅर रुम’ केली जाईल, अशी माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली.
जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. सध्यातर रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे. त्याचबरोबर रेमडेसिविर, ऑक्सिजन संदर्भात रोजच तक्रारी येत आहेत. परंतु, त्याची साधी दखलही घेतली जात नाही, असे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
मुख्याधिकारी डाॅ. कुरुडे म्हणाले, शासनाच्या आदेशाप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिका व पोलीस विभाग संयुक्तपणे विनाकारण आणि मास्क न लावता फिरणाऱ्यांना दंड करत आहे. कर्मचारीही अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
रुग्णांचे नातेवाईक काय म्हणतात...
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. ग्रामीण भाग काय, शहरी भाग काय? बेडसंदर्भात तर अनेकांच्या तक्रारी आहेत. तक्रार कुणाकडे करावी? हा प्रश्न पडत आहे.
- मुरली कल्याणकर, हिंगोली
मागील दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या तर ऑक्सिजन, रेमडेसिविरही मिळेनासे झाले आहे. अधिकारी, कर्मचारीही या संदर्भात कानाडोळा करत आहेत. तक्रार ऐकण्यासही कोणी तयार होत नाही. शासनाने रुग्णांच्या नातेवाईकांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी स्वतंत्र कार्यालय उघडावे.
- वैभव पाटील गोरेगावकर, हिंगोली
गाऱ्हाणे ऐकण्यासाठी कार्यालय उघडावे...
कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना साधे बेडही मिळेना झाले आहेत. तक्रारी व विचारणा करण्यासाठी हिंगोलीत इतर जिल्ह्यांप्रमाणे नगर परिषद किंवा अन्य ठिकाणी शासनाने कार्यालय उघडावे.