वाळूतस्करांकडून तलाठ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:16 AM2019-03-29T00:16:52+5:302019-03-29T00:17:08+5:30
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव परिसरातील कयाधू नदी पात्रातील अवैधरीत्या वाळू उपसा करून अवैध मार्गाने वाहतूक करणारे टॅक्टर महसूल विभागाने २२ मार्च रोजी पुसेगाव येथे पकडले. तर तलाठ्यास मारहाण करणाऱ्या टॅक्टर चालक व मालकावर नर्सी पोलीस ठाण्यात २७ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव परिसरातील कयाधू नदी पात्रातील अवैधरीत्या वाळू उपसा करून अवैध मार्गाने वाहतूक करणारे टॅक्टर महसूल विभागाने २२ मार्च रोजी पुसेगाव येथे पकडले. तर तलाठ्यास मारहाण करणाऱ्या टॅक्टर चालक व मालकावर नर्सी पोलीस ठाण्यात २७ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.
२२ मार्च रोजी तहसीलदार गावातून पुसेगाव फाट्याकडे जात असताना भर दिवसा दोन ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत असताना तलाठी चंद्रकांत साबळे यांनी पकडले आणि घटनास्थळी मंडळ अधिकारी धुळे, पोले, तलाठी इंगळे व इतर थकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून पोलीस ठाण्याकडे घेऊन येत होते. मात्र एमएच ३८ बी. ५३८९ चालक वैजनाथ विश्वनाथ कदम (रा. नर्सी नामदेव), मालक विश्वनाथ तुकाराम कदम (रा. नर्सी नामदेव) याने तलाठी देवीदास संभाजी इंगळे (३०) यांना गिलोरी पाटीजवळ शिवीगाळ करून धक्काबुक्की, थापड बुक्याने मारहाण केली. टॅक्टरमधून ढकलून देऊन तीन हजारांची एक ब्रास वाळू घेऊन गिलोरीकडे पळ काढला. दुसरे टॅक्टर नर्सी पोलीस ठाण्यात लावले आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून इंगोले यांच्या फिर्यादीवरून एमएच ३८ बी ५३८९ चालक वैजनाथ कदम, ट्रॅक्टर मालक विश्वनाथ तुकाराम कदम (रा. नर्सी नामदेव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा तपास नर्सी नामदेव पोलीस ठाण्याचे सपोनि बालाजी येवते करीत आहेत.
दुसºया ट्रॅक्टरवर अद्यापही गुन्हा दाखल झाला नसून त्या ट्रॅक्टर मालक आणि चालक यांना तहसील कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येईल आणि कर भरणा करून घेतल्यावर नर्सी पोलीस ठाण्यातून सोडले जाईल, असे मंडळ अधिकारी धुळे यांनी सांगितले.