नांदेड-गोरखपूर रेल्वे सुरु करा- राजीव सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:12 AM2019-01-08T00:12:04+5:302019-01-08T00:12:21+5:30

नांदेड येथून हिंगोली, अकोला मार्गे वाराणसी-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे बोर्डाचे सदस्य खा. राजीव सातव यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

 Start the Nanded-Gorakhpur Railway - Rajiv Satav | नांदेड-गोरखपूर रेल्वे सुरु करा- राजीव सातव

नांदेड-गोरखपूर रेल्वे सुरु करा- राजीव सातव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नांदेड येथून हिंगोली, अकोला मार्गे वाराणसी-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे बोर्डाचे सदस्य खा. राजीव सातव यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
नांदेड, हिंगोली, अकोला रेल्वे मार्गावरील भाविकांसाठी ईलहाबाद, वाराणसी, बुद्धगया जाण्यासाठी अनेक दिवसांपासून रेल्वेची मागणी केली जात आहे. नांदेड-हिंगोली-अकोला मार्गे गोरखपूर साप्ताहिक रेल्वे सुरू करावी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवलेले आहे. रेल्वे विभागाकडून पाठवलेले प्रस्ताव व्यावसायिक दृष्ट्या देखील अत्यंत फायदेशीर राहणार असल्याने हा प्रस्ताव मंजूर करून ही रेल्वे सुरू करावी अशी मागणी खा.सातव यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. कुंभमेळ्यासाठी रेल्वेगाड्या सोडाव्यात. प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळ्याला जाण्यासाठी हिंगोली लोकसभा क्षेत्रातील रेल्वेमार्गावरुन भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची मागणी खासदार राजीव सातव यांनी केली आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाचे चेअरमन व दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Web Title:  Start the Nanded-Gorakhpur Railway - Rajiv Satav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.