भूगर्भातील चाचणीच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:31 AM2018-12-15T00:31:11+5:302018-12-15T00:31:29+5:30
कयाधू नदीवर शेवाळा येथे उच्चपातळीचा बंधारा बांधण्यासाठी बोअर मारून जमिनीची चाचणी घेण्याच्या कामास सुरवात झाली आहे. पी. आर. देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली असून बधाऱ्यासंबंधीची माहितीही देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कयाधू नदीवर शेवाळा येथे उच्चपातळीचा बंधारा बांधण्यासाठी बोअर मारून जमिनीची चाचणी घेण्याच्या कामास सुरवात झाली आहे. पी. आर. देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली असून बधाऱ्यासंबंधीची माहितीही देण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेषअंतर्गत सापळी धरणाखाली शेवाळा व चिखली येथील उच्च पातळीचे बंधारे मंजूर झाले आहेत. या दोन्ही बंधाºयापैकी शेवाळा येथील बंधाºयासाठी लागणारे पाण्याचे प्रमाणपत्र नाशिक येथील मुख्य अभियंता जलविद्युत यांनी प्रकल्प मंजुर केलेला आहे.
व चिखली येथील बंधाºयाचे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र भेटल्यानंतर चिखली बंधाºयाचे काम हाती घेण्यात येणार आहे. शेवाळा बंधाºयाच्या सर्वेक्षण होऊन पायातील खडक बघण्यासाठी बोअर घेण्याचे काम चालू आहे. पाच बोअरपैकी आतापर्यंत चार पूर्ण झाले. या चार बोअरमध्ये लागलेल्या खडक पाहता शेवाळा गावालगत बंधारा बाधण्यास अडचणी नाहीत. हा बंधारा करण्याच्या दृष्टीने पी.आर. देशमुख यांनी १४ डिसेंबर रोजी शेवाळा येथे सर्वपक्षीय बैठक घेऊन व साईटवर जाऊन पाहणी केली.
यावेळी प्रल्हाद पाटील, डॉ. अरूण सांवत, रावसाहेब पाटील, रामराव सूर्यवंशी, माधवराव सूर्यवंशी, महेश गोविंदवार, चंद्र्रकांत सूर्यवंशी, विलास गांजरे, कैलास सावंत व ग्रामस्थ उपस्थीत होते.