...तर जिल्ह्यातील बहुतेक गावांत सुरू होणार शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:20 AM2021-06-27T04:20:13+5:302021-06-27T04:20:13+5:30

हिंगोली जिल्ह्यात सध्या ऑनलाईन शाळा घेतल्या जात आहेत. खासगी असो वा जि.प.च्या शाळा सगळीकडेच ऑनलाईन कारभार सुरू आहे. ग्रामीण ...

... then schools will start in most of the villages in the district! | ...तर जिल्ह्यातील बहुतेक गावांत सुरू होणार शाळा!

...तर जिल्ह्यातील बहुतेक गावांत सुरू होणार शाळा!

Next

हिंगोली जिल्ह्यात सध्या ऑनलाईन शाळा घेतल्या जात आहेत. खासगी असो वा जि.प.च्या शाळा सगळीकडेच ऑनलाईन कारभार सुरू आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण येत आहे, तर ऑनलाईनमध्ये मुले मोबाईलवर एकाग्र होत नसल्याच्या अडचणी येत आहेत. मात्र प्रत्यक्ष शाळा सुरू करायची, तर तिसरी लाट येण्याच्या धोक्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती आहे का? याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. त्याचे लेखी आदेश अजून प्रशासनास आले नसल्याने तशी काही चाचपणी नाही. मात्र आदेश आल्यास त्यावर विचार करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या तरी ऑनलाईनशिवाय काही पर्याय नाही. कोरोनामुक्त गावांची संख्या ७१० असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी वाव मात्र आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा १३५०

जि.प.शाळा ८८२

अनुदानित शाळा २०८

विनाअनुदानित शाळा २३५

जिल्ह्यातील एकूण गावे ७११

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे ७१०

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

हिंगोली १५३

कळमनुरी १५०

औंढा ११६

वसमत १५१

सेनगाव १३१

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पाचवी २१८००

सहावी २१३००

सातवी २१०००

आठवी २०७००

जिल्ह्यात सध्या ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. मात्र शाळा सुरू करण्यासाठी अजूनही काही सूचना आलेल्या नाहीत. जर तशा काही सूचना आल्याच तर शिक्षकांच्या कोरोना चाचण्या, कोरोनामुक्त गावांची परिस्थिती, शालेय शिक्षण समित्यांची संमती अशी मागच्या वेळीसारखी पद्धत असल्यास ती करूनच निर्णय घेता येणार आहे. तूर्त तरी याबाबत सांगता येणे अवघड आहे.

- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी, हिंगोली

Web Title: ... then schools will start in most of the villages in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.