...तर दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:46+5:302021-07-03T04:19:46+5:30
हिंगोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नगर परिषदेमार्फत करण्यात आलेल्या आवाहनानुसार शहरातील जे व्यापारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी अँटिजन तपासणी करून ...
हिंगोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नगर परिषदेमार्फत करण्यात आलेल्या आवाहनानुसार शहरातील जे व्यापारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी अँटिजन तपासणी करून निगेटिव्ह असल्याबाबतचे प्रमाणपत्र आपल्या आस्थापनामध्ये लावणार नाहीत, अशा व्यापारी, दुकानदार, आस्थापनाविरुद्ध दंडात्मक स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिला आहे.
२ जुलै रोजी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये नगर परिषद पथकामार्फत व्यापारी, दुकानदार व दुकानातील कर्मचाऱ्यांची अँटिजन तपासणी केली नाही अशा आस्थापनांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात केली आहे. नगर परिषदेच्या पथकांमध्ये उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, स्थापत्य अभियंता रवीराज दरक, रचना सहायक किशोर काकडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, संदीप घुगे, विजय रामेश्वरे, राजू असोले, पंडितराव मस्के आदींच्या पथकाने शहरातील आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
आदेशाचे पालन करावे...
कोरोना महामारीचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी व्यापारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. परंतु, काही दुकानदार व व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी केली नसल्यामुळे शुक्रवारी मुख्याधिकारी डॉ. कुरुडे यांनी पथकांसोबत शहरात फिरुन तपासणी मोहीम हाती घेतली.