दुकान फोडून रोख रकमेसह पावणेदोन लाखांच्या एलईडी टीव्ही लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:59+5:302021-06-28T04:20:59+5:30
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील गोविंद विष्णुदास मुंदडा यांचे नर्सी फाटा येथे संत नामदेव फर्निचर ॲड. इलेक्ट्रिकल्सचे दुकान आहे. २७ ...
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील गोविंद विष्णुदास मुंदडा यांचे नर्सी फाटा येथे संत नामदेव फर्निचर ॲड. इलेक्ट्रिकल्सचे दुकान आहे. २७ जूनच्या पहाटे त्यांच्या फर्निचर दुकानाचे टीनपत्रे वाकल्याचे दिसले. याची माहिती गोविंद मुंदडा यांना समजताच त्यांनी दुकानात पाहणी केली. यावेळी दुकानातील १ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांचे ८ एलईडी टीव्ही, तसेच रोख ५२ हजार ७८० रूपये चोरट्यांनी लांबविल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोना रवि हारकळ, गजानन पाेकळे, अशोक धामणे, किशोर पारीसकर, क्षीरसागर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, याप्रकरणी गोविंद मुंदडा यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
फोटो :