तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:55 PM2018-12-15T23:55:32+5:302018-12-15T23:55:47+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूरच्या निवडणुकीसाठी तिसºया दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दोन दिवसात एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूरच्या निवडणुकीसाठी तिसºया दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दोन दिवसात एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे .
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीने आता वेग घेतला आहे. तिसºया दिवशी तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शेतकरी मतदारसंघाच्या अनुसूचित जाती- जमाती प्रवगार्साठी पाईकराव धुरपत नारायण यांनी कोथळज गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पेठवडगाव गणामधून खुल्या प्रवगार्तून पतंगे बालासाहेब रमेशराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्यापारी मतदारसंघ आखाडा बाळापूर गणातून सुनील दामोदर अमिलकंठवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीचे दोन व आजचे तीन असे एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
आता इच्छुकांची लगबग वाढली असून कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या चर्चांना वेग येणार असून युती आघाडीची बोलणी सुरू झाली आहे. त्यानंतरच कोणाला उमेदवारी मिळेल, हे अंतिम होणार आहे.