लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. वसमत तालुका वगळता इतर तालुक्यांतील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मागच्यावर्षीच्या अधिग्रहणासह आतापर्यंत १.२0 कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात यंदा ८0 टक्क्यांच्या आसपास पर्जन्यमान झाले. त्यामुळे विविध भागात टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वसमत तालुक्यात इसापूर व सिद्धेश्वरचे पाणी सोडल्यामुळे यापूर्वी टंचाई कमी जाणवली. आता पुन्हा एकदा इसापूरची एक पाणीपाळी सोडण्याची तयारी सुरू आहे. ती सोडल्यास २६ गावांतील टंचाईसह गुरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.हिंगोली जिल्ह्यातील २४ हजार ६६९ एवढी लोकसंख्या टँकरवर निर्भर आहे. लहान-लहान गावे, वाडी-तांड्यांना टंचाईचा फटका सोसावा लागत आहे. अशा १८ गावांत १३ टँकर सुरू आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्यातील कनका, पेडगाव वाडी, जुमडा, अंधारवाडी, कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा-खापरखेडा, मसोड, हातमाली, रामवाडी, शिवणी खु., महालिंगी तांडा, सेनगाव तालुक्यातील जयपूर, जवळा बु., कहाकर खु., औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळापाणी तांडा, सेवादास तांडा आदी गावांना टँकर सुरू आहे. काही गावांचे नव्याने प्रस्तावही येत आहेत. मात्र काटेकोरपणे तपासणी करून खरेच टँकरची गरज असल्यासच अशा गावांत टँकर देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.टँकरसहित १२३ गावांत १५९ जलस्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये १६ स्त्रोत टँकरसाठी असून उर्वरित १४३ गावातील टंचाई निवारणार्थ अधिग्रहित केले. यामध्ये हिंगोली-७, कळमनुरी-३८, सेनगाव-५0, वसमत-२८, औंढा नागनाथ २0 अशी तालुकानिहाय संख्या आहे.अधिग्रहणांच्या रक्कमेची दरवर्षीची बोंबशेतकºयांच्या जलस्त्रोताचे प्रशासनाकडून दरवर्षी अधिग्रहण केले जाते. मात्र त्याची देयके वेळेत सादर केली जात नाहीत. तसेच अदाही केली जात नाहीत. गेल्यावर्षीच्या अधिग्रहणाचा मोबदला आता शेतकºयांना मिळाला. यंदाच्या देयकांचा तर अजून पत्ताच नाही. टप्प्या-टप्प्याने देयके अदा केल्यास शेतकºयांना बियाणे व खते खरेदीसाठी फायदा होऊ शकतो. गतवर्षीच्या दायित्वासह आतापर्यंत टंचाईत जवळपास १.२0 कोटींचा खर्च झाला असून त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
१८ गावांची तहान भागतेय टँकरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:18 AM