नदीपात्रात अडकले ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:16 AM2019-02-19T01:16:22+5:302019-02-19T01:17:26+5:30
तालुक्यातील पेरजाबाद शिवारातील पूर्णा नदी पात्रात सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याची कल्पना नसल्याने पेरजाबाद शिवारात माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदी पात्रात पाण्यात अडकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील पेरजाबाद शिवारातील पूर्णा नदी पात्रात सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याची कल्पना नसल्याने पेरजाबाद शिवारात माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदी पात्रात पाण्यात अडकले आहे.
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू व माती उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. गौणखनिजाची छुप्या मार्गाने वाहतूक करणारे ट्रॅक्टर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पूर्णा नदीत परभणी शहरासाठी पाणी सोडल्याने पाण्यात अडकले आहे. नदी पात्रात पाणी सोडल्याची कल्पना नसल्यामुळे हे ट्रॅक्टर पाण्यात अडकले आहे.
ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही ट्रॅक्टर पाण्याबाहेर काढता आले नाही. आणखी किमान दोन दिवस पाण्याचा प्रवाह कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टर दिवसभर पाण्यात अडकले होते. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.