लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदिवासी उपाय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्च केला जातो. मात्र त्याचा योग्य विनियोग होतो की, नाही याचा मात्र ताळमेळ नाही. त्यामुळे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हातधिकाऱ्यांनी दिले असून प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेले पथक अशी तपासणी करणार आहे.आदिवासी उपाय-योजने अंतर्गत शासन दरवर्षी मोठा निधी खर्च करते. २०१८-१९ या आर्थिक वर्षातही महावितरणकडून दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी पुर्वीच्या कामांचा हिशोब घेण्याचे ठरविले आहे. महावितरणला दरवर्षी दिला जाणारा निधी तो दिलेल्या कामांसाठीच खर्च केला जातो की नाही, याची कोणतीच तपासणी होत नाही.लाभार्थ्यांची नावे कशी निश्चित होतात. त्यांना लाभ दिला जातो की नाही, हेही कोणी तपासत नाही. त्यामुळे आता होणाºया चौकशीनंतर नेमके काय उघडकीस येणार याकडे लक्ष लागले आहे. याबाबत तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले असून प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले आहे. सन २०१२-१३ पासून आतापर्यंत सदर विभागामार्फत अनुसचित जमातीच्या लाभार्थ्यांना वैक्तीक व सामुहिक लाभाच्या तसेच एमएसईबी मार्फत ओटीएसपी अंतर्गत झालेल्या कामांच्या तपासणीचे निर्देश आहेत. पथकप्रमुख म्हणून प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड, सहायक पथकप्रमुख म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी ए. पी. पवार, सांख्यिकी सहायक ओ. पी. टिक्कस सदस्य आदींचे पथक आदिवासी उपाय योजनेअंतर्गत केलेल्या कामांची तपासणी करणार आहेत.
आदिवासींच्या वीज जोडण्यांची तपासणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:25 AM