अडीचशे जणांनी दिला ‘वधू-वर’ परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:57 PM2018-01-28T23:57:39+5:302018-01-28T23:58:07+5:30
शहरातील महाविरभवन येथे २८ जानेवारी रोजी सकल जैन वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ३०० जणांनी नांव नोंदविले, तसेच अडीचशे जणांनी परिचय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील महाविरभवन येथे २८ जानेवारी रोजी सकल जैन वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ३०० जणांनी नांव नोंदविले, तसेच अडीचशे जणांनी परिचय दिला.
कार्यक्रमाचे उदघाटन खा. राजीव सातव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आ. संतोष टारफे, आ. रामराव वडकुते, अ. जिल्हाधिकारी जगदीश मनियार, दिलीप चव्हाण, मुनीर पटेल, भुपालजी अर्पल, तेजकुमार झांजरी, अॅड. के. के. शिंदे, रूपचंद परतवार, महेंद्रकुमार यंबल, यज्ञकुमार करेवार, विनोद परतवार, मिलींद यंबल आदी उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन वैभव कंदी, किरण मास्ट, सोमेश यरमल, सुशील जैन आदींना केला. मेळावा यशस्वीतेसाठी निश्चल यंबल, सुयोग कंदी, सुदर्शन सोवितकर, लाभेश कंदी, सतिश करेवार, कुलदीप मास्ट, कुणाल यंबल, तसेच समितीच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.