वसमत येथे दोन दिवसीय इज्तेमा; विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:19 AM2019-02-12T00:19:04+5:302019-02-12T00:19:26+5:30
वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये लाखावर मुस्लिम बांधव हजेरी लावणार असल्याने त्या दृष्टीने तयारी होत आहे. मुस्लिम बांधव श्रमदानाद्वारे इज्तेमा परिसरात कामे करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये लाखावर मुस्लिम बांधव हजेरी लावणार असल्याने त्या दृष्टीने तयारी होत आहे. मुस्लिम बांधव श्रमदानाद्वारे इज्तेमा परिसरात कामे करत आहेत.
वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी या दोन दिवसांत तब्लीकी इज्तेमा आयोजित करण्यात आला आहे. नवोदय विद्यालयासमोरील शेतात हा धार्मिक कार्यक्रम होणार असल्याने गेल्या महिनाभरापासून तयारी होत आहे. आता संपूर्ण सज्जता झालेली आहे. या इज्तेमास हिंगोली, परभणी जिल्ह्यासह इतर परिसरातूनही मुस्लिम बांधव हजेरी लावणार आहेत. लाखापेक्षा जास्त मुस्लिम बांधव या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात मान्यवर मौलाना व धर्मगुरू प्रवचनाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यास्थळी भव्य शामियाना, पाण्याची सुविधा, वाहनतळ इ. तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी मुस्लिम बांधव उत्स्फूर्तपणे परिश्रम करत आहेत. कार्यक्रमास विविध जिल्ह्यांतील मुस्लिम समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.