१३ लघुतलाव १00 टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:16 PM2019-11-18T23:16:08+5:302019-11-18T23:16:31+5:30
जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे २६ पैकी १३ लघुतलाव पूर्णपणे भरले आहेत. उर्वरितपैकी ८ तलाव ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तर ३ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे २६ पैकी १३ लघुतलाव पूर्णपणे भरले आहेत. उर्वरितपैकी ८ तलाव ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तर ३ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व काही भागात तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगले पर्जन्यमान झाले. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरीही जलसाठे वाढण्यास मदत झाली. काही ठिकाणचे तलाव या पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील ३ तलाव मात्र अजूनही ५0 टक्क्यांच्या आतच राहिल्याचे चित्र आहे. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतही चिंचखेडा, खोलगाडगा, राहाटी येथे १00 टक्के जलसंचय झाला. केवळ खेर्डा कोल्हापुरी बंधाºयातच ३१ टक्के पाणी साठले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील लघुतलावांमध्ये एकूण ५१ दलघमी जलसाठा झाला आहे. यापैकी ४६ दलघमी उपयुक्त साठा आहे. हिंगोली तालुक्यातील पारोळा १00 टक्के, वडद-९९ टक्के, थोरजवळा १00 टक्के, हिरडी ८५ टक्के, सवड १00 टक्के, पेडगाव-४९ टक्के तर हातगाव तलावात ९६ टक्के जलसाठा झाला आहे. सेनगाव तालुक्यातील सवना ९६ टक्के, पिंपरी ९८ टक्के, घोडदरी १00 टक्के, औंढा नागनाथ तालुक्यातील मरसूळ ३0 टक्के, वाळकी १00 टक्के, सुरेगाव ४0 टक्के, औंढा १00 टक्के, सेंदूरसना १00 टक्के, पुरजळ ८५, वंजारवाडी ६५, पिंपळदरी १00, काकडदाभा-१00, केळी ७५ टक्के भरला आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, देवधरी व बोथी हे तलाव १00 टक्के भरले आहेत. दांडेगाव ९५ टक्के भरला आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावही १00 टक्के भरला आहे. यावर्षी उन्हाळी पिकांपर्यंतही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होण्याची शक्यता आहे.
इसापूर ७८ टक्के, सिद्धेश्वर ९१ टक्क्यांवर
कळमनुरी : इसापूर धरण परिसरात परतीचा पाऊस चांगलाच बरसल्याने इसापूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. सध्या इसापूर धरणात ७८.५५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ४३८.७१ मीटर असून, उपयुक्त जलसाठा ७५७.३३ दलघमी एवढा आहे.
येलदरी धरणात आता ९८ टक्के जलसाठा आहे. या धरणातील एकूण जलसंचय ९१८ दलघमी असून ७९४ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. या धरणातून विद्युतनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून सिद्धेश्वरमध्येही पाण्याचा विसर्ग झाला.
सिद्धेश्वरमध्ये इतर मार्गांनीही येणाºया पाण्यामुळे ९१ टक्के जलसाठा झाला असून जिवंतसाठा ७४ दलघमी तर एकूण २४४ दलघमी पाणी आहे. यामुळे यंदा जिल्ह्यालगतच्या सर्वच धरणांत दरवर्षीपेक्षा कित्येक पटीने चांगला जलसाठा झाला आहे.