आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:31 AM2018-12-03T00:31:22+5:302018-12-03T00:31:37+5:30
तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेत डबा पार्टीचे आयोजन केले. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे काम ९५ टक्के झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेत डबा पार्टीचे आयोजन केले. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे काम ९५ टक्के झाले.
यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, मुख्याध्यापक कºहाळे व शिक्षक हजर होते. दनांक २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत जिल्हाभरात गोवर रुबेला मोहीम राबवून जिल्ह्यातील ६५ हजार १५१ बालकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. सर्व पालकांनी ९ महिने १५ वर्ष वयोगटातील बालकांनी गोवर रुबेला लस देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. यावेळी डॉ. सतीश रुणवाल यांनी सत्राची पाहणी केली. तसेच शाळेत एक निरीक्षण कक्ष, एक प्रतिक्षा कक्ष, एक लसीकरण सत्र खोली अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती.