१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग; दररोज ३०० वर काॅल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:55+5:302021-04-20T04:30:55+5:30
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांबरोबर इतर रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये अपघात, मार लागणे, हृदयरोग, पडणे, विषबाधा, ...
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांबरोबर इतर रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये अपघात, मार लागणे, हृदयरोग, पडणे, विषबाधा, विजेचा शाॅक लागणे, मोठा अपघात, मेडिकल, पोली ट्रामा, आत्महत्या आदींचा समावेश आहे. १०८ या क्रमांकावर जानेवारी महिन्यात १६१८, फेब्रुवारी महिन्यात ११९६, मार्च महिन्यात १३११ काॅल्स आले होते. १०८ क्रमांकावर फोन आल्यानंतर शहरात वेळ लागत नाही. पण बाहेर जिल्ह्यासाठी जाण्यासाठी पाऊण तास तरी लागतो. काॅल केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी थोडा धीर धरायला पाहिजे. परंतु, नातेवाईक धीर धरत नाहीत. सतत काॅल करतात. त्यामुळे वेटिंग येते. १०८ क्रमांकावर शहरातून येणारे काॅल हे १७.५३ तर ग्रामीण भागातून येणारे काॅल हे ८२.४७ टक्के असतात. जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत या तालुक्यात प्रत्येकी २ आणि हिंगोली तालुक्यात ४ रुग्णवाहिका सद्यस्थितीत कार्यरत आहेत. सर्वच रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, डाॅक्टर, मेडिसीनची व्यवस्था आहे. तीन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावे. १०८ रुग्णवाहिकेत बसताना मास्क लावूनच बसावे, असे आवाहन रुग्णवाहिकेचे प्रमुख तुषार भोसले यांनी केले आहे.