हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांना अजूनही म्हणावी तशी गती नाही. कृषी विभागाची ८१५ कामे झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात दीडशे कामे तर ठिबक व तुषार संच वाटपाचीच आहेत.हिंगोली जिल्ह्यात २0१८-१९ या आर्थिक वर्षात जवळपास ११५ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेची कामे होणार आहेत. यातील आराखड्यानुसार २४४८ कामे प्रस्तावित असून सर्वाधिक १४९५ कामे एकट्या कृषी विभागाची आहेत. यात खोल समतल चर१४ पैकी ६ पूर्ण ५ प्रगतीत आहेत. ढाळीचे बांध २२३ पैकी ३ पूर्ण तर ४१ प्रगतीत आहेत. शेततळ्यांचे ४0८ पैकी ३८८ पूर्ण व २0 प्रगतीत असल्याचे म्हटले असून हा लक्षणीय आकडा गाठला कसा? हा प्रश्नच आहे. सिमेंट नाला बंधाऱ्याची २६ पैकी १ पूर्ण तर ६ प्रगतीत आहेत. अतिशय वाईट कामगिरी या प्रकारात आहे. तुषार व ठिबकचे प्रत्येकी ७५ संच वितरित केले आहेत. नाला खोलीकरणाची ५७२ पैकी २४९ कामे पूर्ण तर ९२ प्रगतीत आहेत. हीच काय ती सर्वांत कामगिरी असल्याचे चित्र दिसत आहे. शासकीय नाला खोलीकरणाचीही २0 पैकी १३ कामे पूर्ण आहेत. सिमेट नाला बांधातील गाळ काढण्याची २८ कामे पलंबित आहेत. गॅबीयन बंधाऱ्यांच्या ४0 कामांनाही मुहुर्त नाही.वनविभागाने डीप सीसीटीची १४ पैकी ४ कामे पूर्ण केली तर १0 सुरू आहेत. वनतळ्यांची २0 पैकी ८ पूर्ण तर १२ सुरू आहेत. माती नाला बांधाची २२ पैकी १३ पूर्ण तर ९ सुरू आहेत.लघुसिंचन विभागाची सिमेंट नाला बंधाऱ्यांची २९ कामे ठप्प आहेत. नाला खोलीकरणाची ६९ पैकी ४८ पूर्ण झाली. भूजल सर्वेक्षणचे १३५ रिचार्ज शाफ्ट तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे १९५ रिचार्ज शाफ्टची कामे अजून सुरूच नाहीत. जलसंधार विभागाच्या ४0 सिमेंट नाला बांधाचेही काम सुरू नाही. केवळ ४२९ पैकी २११ नाला सरळीकरणाची कामे झाली.सिमेंट बांध दुर्लक्षितकिरकोळ कामे तेवढी आटोपली जात असल्याने यंदा जलयुक्त शिवार योजनेतील खर्चात वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. वाळूचा प्रश्न पुढे करुन सर्वच विभागांनी सिमेंट नाला बांधाची कामे सुरूच केली नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सध्या खाजगी कामे एवढ्या जोरात सुरू असताना शासकीय कामांनाच वाळूचा अडसर येण्यामागचे गणित कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे देयकातूनही रॉयल्टी कपात करण्याची मुभा असताना ही परिस्थिती उद्भवल्याने यात अडवणुकीचा तर प्रकार नाही, याची चाचपणी करावी लागणार आहे.जलयुक्तच्या आराखड्यानुसार जवळपास ४८ कोटींची कामे आहेत. यात २.६४ कोटींची कामे पूर्ण झाली. तर प्रगतीतील कामांवर ७.२२ कोटींचा खर्च झाला. एकूण ९.८६ कोटींपर्यंतच खर्च जात आहे.
जलयुक्तची गती अजूनही धिमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:59 AM
जलयुक्त शिवार योजनेतील कामांना अजूनही म्हणावी तशी गती नाही. कृषी विभागाची ८१५ कामे झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात दीडशे कामे तर ठिबक व तुषार संच वाटपाचीच आहेत.
ठळक मुद्देमार्च एण्ड जवळ येत असल्याने चिंता